खेड: येथील लायन्स एज्यूकेशन सोसायटी संचालित एलटीटी इंग्लिश मिडीयम स्कुलने दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन आहे. प्रशालेत आस्था गुरुनाथ सारंग हिने ९८.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. प्रशालेतील १७८ पैकी १७७ विद्यार्थी उत्त्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल ९९.४४ टक्के लागला. संदेश पंढरी मुंढे ९५.२० टक्के गुण मिळवून द्वितीय तर प्रगती प्रदोष सावंत व आस्मा आरिफ मुकादम ९४.६० टक्के गुण मिळवून प्रशालेतून तृतीय क्रमांक पटकावला. प्रशालेच्या अजिंक्य योगेशआपटे याने गणित विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवले.
संस्थेचे अध्यक्ष अहमद मुकादम तसेच परवेज मुकादम, मजीद खतीब, जयेश गुहागरकर ,प्रेमळ चिखले, चंद्रकिरण वैद्य, विलीन पाटणे, पुष्कर नेने, समन्वयक जॉय, एल्सी जॉय, मुख्याध्यापक गुरुनाथ सारंग आदींनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
--
Post a Comment