दापोली कृषी विद्यापीठामध्ये संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचे आयोजन

कर्जत : डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ५४ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची बैठक ०९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाला राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, गृह, शहरे , महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, नागरी सुरक्षा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, वित्त नियोजन, कृषी, मदत व पुर्नवसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल, रायगड जिल्ह्याचे खासदार सुनिल तटकरे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे उपाध्यक्ष तुषार पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून तर कृषी सचिव परिमल सिंग, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे महासंचालक राहुल महिवाल, कृषी आयुक्त सुरज मांढरे तसेच चारही विद्यापीठाचे कुलगुरू विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून यजमान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे हे राहणार आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत चारही कृषी विद्यापीठामध्ये गतवर्षात झालेल्या संशोधनावर साकल्याने चर्चा होणार असून यात चारही कृषी विद्यापीठातील ३०० हुन अधिक शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. बैठकीमध्ये शेतकरी , कृषी विभाग, दुग्धशास्त्र विभाग, हवामान विभाग इत्यादीसाठी महत्त्वपूर्ण संशोधनपर शिफारशीदेखील सादर करण्यात येणार आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाच्या वतीने प्रसारणाकरीता यंत्र अवजारे १ , विविध पिंकातील तंत्रज्ञान शिफारशी ३६ आणि पूर्व प्रसारणाकरीता एका वाणाची शिफारस करण्यासाठी बैठकीमध्ये ठेवण्यात येणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांचे प्रस्तावित वाण १०, प्रसारणाकरीता यंत्रे अवजारे १६ , पीक तंत्रज्ञान शिफारशी ८६ , पूर्व प्रसारणाकरीता वाण ०६ ; महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांचे प्रस्तावित वाण 11, प्रसारणाकरीता यंत्रे अवजारे ०५ , पीक तंत्रज्ञान शिफारशी ८६ , पूर्व प्रसारणाकरीता वाण ०९ आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांचे प्रस्तावित वाण ०५ , प्रसारणाकरीता यंत्रे अवजारे ०४ , पीक तंत्रज्ञाना संबंधी ४२ शिफारशी या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्याअंतर्गत येणाऱ्या कृषी, मत्स्य, फलोत्पादन, पणन इत्यादी महत्त्वाच्या विभागांचे सादरीकरण होणार आहे. सदर बैठकीकडे महाराष्ट्रातील विविध विभागातील शास्त्रज्ञ, उच्चस्तरीय अधिकारी आणि प्रगतशील शेतकरी यांचे लक्ष लागले आहे. 
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...