शिवचैतन्य पतसंस्थेला १. ४१ कोटी रुपयांचा नफा



खेड :पारदर्शक कारभाराच्या बळावर ६ ठिकाणी शाखांचा विस्तार करत सहकार क्षेत्रात अल्पावधीत गरुडझेप घेणाऱ्या
येथील शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेने आर्थिक वर्षात १ कोटी ४१ लाखांचा ढोबळ नफा मिळाला असल्याची माहिती पतसंस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी यांनी दिली.ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबवण्यावर भर देणार असल्याचेही स्पष्ट केले. 

जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या या 
पतसंस्थेच्या खेड, भरणे, दापोली,
मंडणगड, शृंगारतळी, चिपळूण अशा ६ शाखा कार्यान्वित आहेत. येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे चौकात विजयश्री कॉम्प्लेक्स येथे संस्थेचे प्रधान कार्यालय असून याद्वारे ग्राहकांना दर्जेदार अन् तत्पर सेवा देण्यासाठी संस्था सदैव कटिबद्ध आहे.
गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठीही कटिबद्ध : पित्याचे छत्र हरपलेल्या अन् शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी संस्था नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे.
 संकटकाळात अडकलेल्या कुटुंबियांनाही सढळ हस्ते आर्थिक
मदतीचा हात देत आजवर संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
जोपासण्यासह बेरोजगार तरुणांचा
आर्थिक उत्कर्ष साधण्यासाठी
तातडीने कर्जपुरवठा करण्यावर
भर दिला जात असल्याचे पतसंस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी यांनी सांगितले.
२०२५-२६ या आर्थिक वर्षात
तरतूदी वजा जाता १ कोटी १८ लाखांचा निव्वळ नफा पतसंस्थेने मिळवला आहे. कर्ज विभागात सोनेतारण कर्जासारख्या सुरक्षित कर्जाचे प्रमाण सर्वाधिक आहे.
जामीन तारण कर्ज, वाहन तारण कर्ज, स्थावर तारण कर्ज या माध्यमातून तत्पर कर्ज सेवा देण्यावर भर दिला जात आहे.
पतसंस्थेने आतापर्यंत राखलेल्या आदर्श प्रमाणे कामगिरीत सातत्य राखले असून सर्व शाखाही नफ्यात आहेत. पतसंस्थेने आजवर केलेल्या प्रगतीत संस्थेचे सर्व संचालक, सल्लागार, कर्मचारी, सभासद, ग्राहक ठेवीदार व हितचिंतक यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. यापुढेही विश्वासार्हता कायम जपून ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबवण्यावर भर देणार असल्याचे पतसंस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष मिलींद इवलेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय महाजन यांनी सांगितले.
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...