श्री समर्थ कृपा विद्यालयाचे दहावी परीक्षेत यश

खेड: वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्यूनिअर कॉलेज(सी.बी.एस.ई.) या प्रशालेच्या दहावी (२०२५ - २०२६) विद्यार्थ्यांनी भरघोस यश प्राप्त केले आहे.
 यामध्ये सिया शेट्टी (९६.४०%) , रुद्र घोसाळकर (९४.२० %), अर्शिया पालेकर (८४.४०% ) यांनी उत्तम गुण मिळवून प्रशालेमध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला आहे.
  
 सिया शेट्टी हिने आयटी व आर्य केळकर याने मराठी विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळवले.
     तसेच आदिती बांद्रे (८१.४०%) ईश्वरी घाडगे (८१.२०%), आर्य केळकर (८०.४०%) या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन करुन प्रशालेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
   या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री. सुयश पाष्टे, उपाध्यक्षा सौ. सुप्रिया पाष्टे, शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन श्री. उदय शेटवे, खजिनदार श्री. दिग्विजय इंदुलकर, प्राचार्य डॉ.एस.एस.अली, श्री.विनोद कुमार सिंग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...