दापोलीत बनावट वायर्स विक्री केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल




(संग्रहित छायाचित्र)
दापोली: येथील बाजारपेठेतील एका इलेक्ट्रिक सामानाच्या दुकानातून नामवंत कंपनीच्या नावाखाली बनावट इलेक्ट्रिक वायरची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संबंधित दुकानदारावर कॉपीराईट आणि ट्रेडमार्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, सुमारे १ लाख ३८ हजार ७६० रुपये किमतीचा नकली माल जप्त केला आहे. 
याप्रकरणी हैद्राबाद येथील नागेश्वरराव कृष्णमुर्ती नंदीगामा (वय ४६) यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली बाजारपेठेतील 'निर्णय ईलेक्ट्रीकल्स' या दुकानाचा मालक सुनील अनंत पालटे (वय ५८, रा.
उदयनगर, दापोली) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पॉलिकॅब या नामांकित कंपनीच्या नावाचा गैरवापर करत होता. बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:५० वाजण्याच्या  सुमारास या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला असता, तिथे पॉलिकॅब कंपनीच्या ओरिजनल वायरसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या नकली वायर्स विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले.

पोलिसांनी या कारवाईत खालील प्रमाणे बनावट वायर्सचे बॉक्स जप्त केले आहेत:
१.० चौ.मीमी. वायर्स: २,६५० रुपये किमतीचे एकूण ६ बॉक्स (एकूण किंमत १५,९०० रुपये).
१.५ चौ.मी.मी. वायर्स: ३,६०० रुपये किमतीचे एकूण ३१
( एकूण किंमत १११६०० रुपये).
२.५ चौ.मी मी. वायर्स: ५,६३० रुपये किमतीचे एकूण २ बॉक्स (एकूण किंमत ११,२६० रुपये).

संशयित आरोपी सुनील पालटे याने मूळ कंपनीच्या मालकी हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॉपीराईट ट्रेडमार्क अॅक्ट १९५७ (सुधारीत अधिनियम १९८४ आणि १९९४) च्या कलम ५१ व ६३ प्रमाणेगुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...