नारी शक्ती मंगळागौर सोहळ्यात भरणेचा काळकाई कृपा मंगळागौर ग्रुप तृतीय

खेड : सामाजिक कार्यकर्त्या व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया कदम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवसेना खेड तालुका महिला आघाडी आयोजित तालुकास्तरीय ‘नारी शक्ती मंगळागौर सोहळा २०२६’ रविवारी २३ ऑगस्ट रोजी उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या स्पर्धेत भरणे येथील काळकाई कृपा मंगळागौर ग्रुपने तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना रोख रुपये २५ हजार व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, पारंपरिक संस्कृतीचे जतन करणे तसेच महिलांमध्ये एकोपा व आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत खेड तालुक्यातील विविध महिला मंडळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. पारंपरिक मंगळागौर खेळ, फुगड्या, नृत्य तसेच विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सादर केलेल्या विविध कलाविष्कारांना उत्स्फूर्त दाद मिळाली.


काळकाई कृपा महिला मंडळाच्या 
निधी नितीन विटमल, श्यामल सतीश फागे, पूर्वा प्रशांत चव्हाण, श्रुती सुरज चव्हाण, साक्षी नितीन खेराडे, अर्पिता अजित जाधव, अनुष्का अनंत जाधव, अक्षरा गजेंद्र बेंद्रे, रेवा रुपेश कदम, सुजाता तुलसीराम बाईत, स्नेहल महेंद्र जोगले, माधवी संकेत खेराडे, दूर्वा सुमित शिंदे, सृष्टी संजय पंडम यांनी सहभाग घेतला.
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...