श्री समर्थ कृपा विद्यालयात स्काऊट-गाईड, कब-बुलबुलच्या माध्यमातून रक्षाबंधन उत्साहात

खेड : श्री समर्थ विश्व कृपा प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज (सी.बी.एस.ई.), वेरळ येथे शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यालयातील स्काऊट-गाईड आणि कब-बुलबुल यांच्या माध्यमातून रक्षाबंधनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा गोडवा जपला. तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमात विद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. रक्षाबंधनाच्या माध्यमातून प्रेम, आपुलकी, बंधुभाव आणि सामाजिक एकोपा यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आले.

हा उपक्रम गाईड प्रमुख भक्ती घडशी आणि बुलबुल प्रमुख राधा चव्हाण तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमामुळे विद्यालयात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...