खेड: व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या एमएच सीईटी परीक्षेमध्ये वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विज्ञान शाखेतील बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात उत्तुंग भरारी घेतली आहे.
यामध्ये पीसीबी विभागातून श्रुती जोशी (९९.४५ पर्सेंटाइल), सिमरन शिंदे (९९.२६ पर्सेंटाइल), अरस्लान खान (९९.२५ पर्सेंटाइल), प्राची शिगवण (९८.५५ पर्सेंटाइल), प्रज्वल सुरावसे (९७.०३ पर्सेंटाइल), वेदांत बागकर (९४.२८ पर्सेंटाइल), शाल्मली मोरे (९१.६६ पर्सेंटाइल), प्रिन्स गुप्ता (८९.७३ पर्सेंटाइल) या विदयार्थांनी यश प्राप्त केले असून प्रशालेच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. तसेच प्रशालेची अविरत यशाची परंपरा चालू ठेवली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना जेईई व नीट आणि एमएच सीईटी विभागप्रमुख विनोद सिंग, मयंक गुप्ता , अश्विनी कुमार, आदर्श गौरव, अंकित, शिवा, नागेंद्र सिंग, राजेश या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संस्था अध्यक्ष श्री.सुयश पाष्टे, चेअरमन श्री. उदय शेटवे, खजिनदार श्री. दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉ. एस. एस. अली, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
--
Post a Comment