श्री समर्थ कृपा विद्यालयाचे बारावी परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश

 



खेड: तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या (सी.बी.एस.ई.) विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेमध्ये भरघोस यश संपादन केले.
      यामध्ये शाल्मली मोरे (८८.४०टक्के), प्राची शिगवण (८८टक्के), शताक्षी मयेकर (८७.२० टक्के), अर्णव गोगेकर (८५.८०टक्के), प्रज्वल सुरावसे (८३.६० टक्के), पारस झगडे (८२ टक्के), सानिया खेडेकर (८०.२०टक्के) या विदयार्थांनी उत्तम गुण मिळवून सुयश संपादन केले तसेच प्रशालेच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव कोरले असून प्रशालेची अविरत यशाची परंपरा चालू ठेवली आहे.
    संस्था अध्यक्ष श्री.सुयश पाष्टे, उपाध्यक्षा सौ.सुप्रिया पाष्टे, सेक्रेटरी डॉ. संजना पाष्टे, चेअरमन श्री. उदय शेटवे, खजिनदार श्री. दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉ. एस. एस. अली, जेईई व निट विभाग प्रमुख विनोदकुमार सिंग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...