खोपी गोरेवाडीत दिवसाढवळ्या वाघाचा हल्ला; दोन बकऱ्यांचा मृत्यू




खेड : तालुक्यातील खोपी-गोरेवाडी येथे गुरुवारी (१३ ऑगस्ट) दिवसाढवळ्या वाघाने बकऱ्यांवर हल्ला करून दोन बकऱ्यांना ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाळाजी बाबू गोरे यांच्या पत्नी बकऱ्या चारण्यासाठी रानात गेल्या असता दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास दोन बिबटयानी त्यांच्या डोळ्यादेखत बकऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन बकऱ्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी परमेश्वर डोईफोडे व वैभव काटेखाये यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला. यावेळी आर्यन कदम, बबन जानकर, संजय बावदाने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दिवसा मानवी वस्तीच्या जवळ बिबटयांचा वावर आणि बकऱ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात चिंता वाढली असून, वन विभागाने वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...