श्री समर्थ कृपा प्रशालेचा १० वा वर्धापन दिन उत्साहात; गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दशकपूर्ती



खेड, दि. १९ जुलै : खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित *श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल (सीबीएसई)*चा १० वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या या शैक्षणिक प्रवासाने दहा वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत ११ व्या वर्षात पदार्पण केले.
वर्धापन दिनानिमित्त प्रशालेत सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्लेग्रुप, नर्सरी, केजी आणि पाळणाघर अशा छोट्याशा उपक्रमातून सुरू झालेल्या या शाळेने आज परिसरातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान निर्माण केले आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा, सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यात संस्था यशस्वी ठरली आहे.
संस्थेने नव्याने सुरू केलेल्या JEE, NEET आणि CET या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभ्यासक्रमालाही विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या क्षेत्रातही उल्लेखनीय प्रगती होत आहे. शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि संस्थेच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनामुळे प्रशालेची शैक्षणिक वाटचाल अधिक भक्कम होत असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

वर्धापन दिनानिमित्त अरहान वागळे, इलाफ बडे, प्रणाली गायकर, नारायणी गीते, ओवी जाधव, मंजिरी चांदणे, आयुष खोपडे, परिधी गुप्ता, मृण्मयी बाभल, शार्विल वाघ, आर्वी खेडेकर, आयेशा वागळे, ओम कदम, मंथन निकम, सार्थक डोईफोडे आणि ओम जाधव या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करत प्रशालेबद्दलच्या आपल्या भावना मांडल्या.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुयश पाष्टे, उपाध्यक्षा सुप्रिया पाष्टे, शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्राचार्य डॉ. एस. एस. अली, सीईओ विजय रॉबर्ट तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन नलिनी नाईक यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...