एमआयबी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये अजितदादा पवार जयंती उत्साहात साजरी

खेड, दि. २२ : शहरातील बज्म-ए-इमदादीया संस्थेच्या एम.आय.बी. गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये बुधवारी (दि. २२ जुलै) राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर होत्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचा उद्देश विजय मोहिते यांनी उपस्थितांना सांगितला.

अध्यक्षीय भाषणात रुबीना कडवईकर यांनी थोर व्यक्तींच्या विचारांचे महत्त्व विद्यार्थिनींना पटवून देत अजितदादा पवार यांच्या सामाजिक व विकासात्मक कार्याचा आढावा घेतला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि लोकहिताची भावना जोपासावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना केले. तसेच उपस्थितांना अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या शुभेच्छाही दिल्या.

कार्यक्रमाचा समारोप आभारप्रदर्शनाने झाला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...