खेड : पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानदीप प्रशालेचा शाश्वत शितल रवींद्र ओकटे याने राज्यात १६ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या उज्ज्वल कामगिरीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शाश्वतच्या यशामागे ज्ञानदीप शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांचे मार्गदर्शन तसेच आजी-आजोबांचे प्रोत्साहन आणि कुटुंबीयांची साथ मोलाची ठरली आहे.
अभ्यासात सातत्य, मेहनत आणि जिद्द असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते, हे शाश्वतने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. अभ्यासाबरोबरच त्याला गायन आणि शेतीचीही विशेष आवड असून विविध क्षेत्रांमध्येही तो सक्रिय सहभाग घेत असतो.
शाश्वतच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
--
Post a Comment