बज्म-ए-इमदादीयाच्या शाळांमध्ये पालक-शिक्षक सभा उत्साहात संपन्न


खेड : शहरातील बज्म-ए- इमदादीया संस्थेच्या एम.आय.ए. केजी अँड प्रायमरी स्कूल तसेच एम.आय.बी. गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे नुकत्याच पालक-शिक्षक सभा उत्साहात पार पडल्या. या सभांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, उपस्थिती, अभ्यासातील प्रगती आणि आगामी शैक्षणिक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

सभेदरम्यान शाळेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल पालकांसमोर सादर करण्यात आला. शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ध्येय-धोरणांबाबतही पालकांशी संवाद साधून त्यांच्या सूचना जाणून घेण्यात आल्या.

संस्थेचे माननीय अध्यक्ष ए. आर. डी. खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सभांचे नियोजन यशस्वीरीत्या पार पडले. मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत पालकांशी सकारात्मक संवाद साधला.

या पालक-शिक्षक सभेला मोठ्या संख्येने पालक उपस्थित राहिले. पालकांनी शाळेच्या शैक्षणिक व संस्कारप्रधान उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेसोबत सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...