खेड: मुंबई-गोवा महामार्गावर खवटी रेल्वेच्या उड्डाण पुलाच्या नजीक मुंबईवरून गणपतीपुळे येथे जात असलेले टेम्पो ट्रॅव्हलर चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. या अपघातात टेम्पोट्रॅव्हलर मधून प्रवास करणारे चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच भरणे नाका पुलाखाली उभी असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणिजधाम २४ तास अपघात मदतीसाठी सेवेस असलेली विनामूल्य रुग्णवाहीका
तात्काल घटनास्थळी पोचली. या अपघातात जखमी झालेल्या अपघातग्रस्त अनु विनायक
कोलमकर (वय ३८, रा. दहिसर, त्रिशा अनिल सिंग (८ वर्ष) रा.
दहिसर), गुंजन अनिल सिंग (वय २१, मुंबई दहिसर), अनिल श्रीशंकर सिंग (वय ३८, मुंबई दहिसर यांना घेऊन कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातग्रस्तांना रुग्णवाहीका चालक सुरज हंबीर यांनी मदत केली.
--
Post a Comment