६६ हजारांच्या ब्राऊन हेरॉईनसह तरुण जेरबंद; शहर पोलिसांची धडक कारवाई


रत्नागिरी : येथील शहर पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कारवाई करत ६६ हजार रुपये किमतीच्या ब्राऊन हेरॉईनसह एका संशयितास ताब्यात घेतले. ही कारवाई दि. १ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास कोकणनगर येथील साईभूमी अपार्टमेंटच्या पाठीमागील परिसरात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरमान लियाकत धामस्कर (२७, रा. जे. के. फाईल्स, रत्नागिरी) हा ब्राऊन हेरॉईन हा अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या ताब्यातून ५.५ ग्रॅम वजनाचा ब्राऊन हेरॉईन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ६६ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...