खेड: श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज (सीबीएसई.) वेरळ येथील वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेमध्ये भरघोस यश संपादन केले.
यामध्ये वाणिज्य शाखेमधून सिध्दी कडजवकर (८९.१७ टक्के), आफ्रा सांगले (८५.८३ टक्के), अंजली जंगम (८१.३३ टक्के) तसेच विज्ञान शाखेमधून आर्या कदम (८२ टक्के) , सिद्दीकी बुशरा (७१.५० टक्के) जयदीप भोरजे (६९.३३ टक्के) यांनी उत्तम गुण मिळवून प्रशालेमध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय येण्याचा मान पटकावला आहे. तसेच या विदयार्थांनी सुयश संपादन करुन प्रशालेच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव कोरले असून प्रशालेची अविरत यशाची परंपरा चालू ठेवली आहे.
संस्था अध्यक्ष श्री. सुयश पाष्टे, उपाध्यक्षा सौ.सुप्रिया पाष्टे, सेक्रेटरी डॉ. संजना पाष्टे, चेअरमन श्री. उदय शेटवे, खजिनदार श्री. दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉ. एस. एस. अली, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
--
إرسال تعليق