मुंबई गोवा महामार्गावर वेरळ येथे कारची दुचाकीला धडक; चार जखमी



   
खेड:तालुक्यातील वेरळ येथे महामार्गावर गणपतीकृपा हॉटेल नजीक शुक्रवारी (१ मे) सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास  मुंबई भांडुप येथून राजापूरच्या दिशेने जात असलेल्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत चार जण जखमी झाले आहेत. 
मुंबई -भांडुप येथून दळवी कुटुंब कारने (एम एच ०३इएफ ६८८६) राजापूर येथे जात असताना कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने पुढे जात असलेल्या मोटरसायकल (एमएच १२एफएस ७३३२) ला पाठीमागून धडक देत कार सर्विस रोडच्या बाजूला असलेल्या भिंतीवर आदळली. या अपघातात कार मधून प्रवास करणाऱ्या शीला राजाराम दळवी (वय ७४), सदानंद गणपत दळवी (वय ६५), गिरीश राजाराम दळवी (वय ४५) सर्व राहणार भांडुप- मुंबई व मोटर सायकल चालक दीपक अनंत गोवळकर (वय ३१, रा.वेरळ, ता.खेड) जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच 
या अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली तैनात
असलेल्या जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणिजधाम यांच्या २४ तास अपघात मदतीसाठी सज्ज असलेल्या विनामूल्य रुग्णवाहिकेने तत्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले. रुग्णवाहिका चालक
सुरज हंबीर यांनी तत्परता दाखवत मदतकार्य केले. या अपघाताची पुढील तपासणी पोलिसांकडून सुरू आहे.
--

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...