खेड : येथील लायन्स एज्युकेशन सोसायटी संचालित एल.टी.टी. इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेजने इयत्ता बारावी (एच.एस.सी.) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या विज्ञान व वाणिज्य या दोन्ही शाखांचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची कामगिरीची परंपरा कायम ठेवली.
वाणिज्य शाखेत झोया मेहदीहसन महेदवी हिने ९४.३३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. फहद रियाझउद्दीन तिसेकर याने ८९.१७ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर अरहान इकलाक जसनाईक याने ८७.५० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक संपादन केला.
विज्ञान शाखेत सोहम राजेश शिंदे याने ८०.०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. ओम राजेश शिंदे याने ७९.१७ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर सफा मोहम्मद अली कास्मी हिने ६७.८३ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.
संस्थेचे अध्यक्ष अहमदभाई मुकादम, परवेज मुकादम, मजीद खातीब, जयेश गुहागरकर, प्रेमळ चिखले, चंद्रकिरण वैद्य, विलीन पाटणे, पुष्कर नेने, समन्वयक जॉय, एल्सी जॉय, मुख्याध्यापक श्री गुरुनाथ सारंग तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. कुडाळकर आदी मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
إرسال تعليق