अभियांत्रिकी व फार्मसीसाठी पुन्हा होणार ‘सीईटी’!

२६ एप्रिलपर्यंत ऑनलाईन परीक्षा; मे महिन्यात विद्यार्थ्यांना पुन्हा संधी

मुंबई: अभियांत्रिकी व फार्मसी प्रवेशासाठी सध्या ११ ते २६ एप्रिल या कालावधीत (सुट्ट्यांचे दिवस वगळून) नोंदणीकृत विद्यार्थ्यांची ‘सीईटी’ परीक्षा सुरु आहे. दोन सत्रात (सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५) ऑनलाईन परीक्षा होत आहे.
सोलापूरसह राज्यभरातील साडेसात लाख विद्यार्थ्यांनी फार्मसी व अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यामुळे ११ एप्रिलपासून पुढील १५ दिवस ‘सीईटी’ होत आहे. २०० गुणांच्या पेपरसाठी तीन तासांचा वेळ असतो. प्रत्येक सत्राचा पेपर वेगवेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक बॅचच्या ज्या विद्यार्थ्यास सर्वाधिक गुण मिळतात त्यावरुन पर्सेंटाईल ठरते. सर्वाधिक पर्सेंटाईलवरुन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.
दरम्यान, ‘जेईई’च्या धर्तीवर आता अभियांत्रिकी व फार्मसी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना देखील ‘सीईटी’च्या दोन संधी मिळणार आहेत. मे महिन्यात पुन्हा एकदा ‘सीईटी’ होणार आहे. आता सुरु असलेल्या ‘सीईटी’त कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना किंवा काही अडचणीमुळे ज्यांना ‘सीईटी’ देता आली नाही, त्यांना मे महिन्यात पुन्हा परीक्षा देता येणार आहे.
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...