रत्नागिरी, दि. २४ : रत्नागिरी येथील राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) येथे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया २४ ऑगस्टपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. इच्छुक महिला उमेदवारांनी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.
व्यावसायिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तत्काळ रोजगार, स्वयंरोजगार तसेच पुढील उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी या प्रवेश प्रक्रियेचा विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा. संस्थेत विद्यार्थिनींसाठी सुसज्ज वसतिगृहाची सुविधा उपलब्ध असून, प्रशिक्षणार्थींना नियमानुसार दरमहा ५०० रुपये विद्यावेतन दिले जाते.
अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनींना नियमानुसार १० वी व १२ वी समकक्षता प्रमाणपत्र देण्यात येते.
उपलब्ध अभ्यासक्रम
- इलेक्ट्रीकल (वीजतंत्र)
- आयटी – ICTSM
- COPA – कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट
- फ्रुट्स ॲण्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग
- कॉस्मेटोलॉजी (ब्युटी पार्लर)
- स्युईंग टेक्नॉलॉजी (शिलाई तंत्रज्ञान)
संपर्कासाठी
एस. एन. पोकडे (प्र. गटनिदेशक) – ९४२२९६६०४४
एम. एम. दळी (शिल्पनिदेशक, FVP) – ९९७०४३२७४२
एस. एम. वेतोस्कर (शिल्पनिदेशक, ICTSM) – ९४२३८७५९७०
इच्छुक महिला उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह संस्थेत संपर्क साधून प्रवेशाचा लाभ घ्यावा.
Post a Comment