श्री समर्थ कृपा विद्यालयात विश्व भरारी सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता




खेड: तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळमध्ये २६ व २७ एप्रिल रोजी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम दिमाखात संपन्न झाला.
  या वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या रोबोटिक लॅबचे प्रमुख अतिथी संजयकदम (माजी आमदार), शशिकांत चव्हाण (शिवसेना जिल्हाप्रमुख ), सचिन धाडवे (जिल्हा परिषद सदस्य), आफिया पालेकर (पंचायत समिती सभापती), श्री.संग्राम कदम (पंचायत समिती सदस्य), श्रीमती. सुनंदा खेडेकर या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सौ.अस्मिता केंद्रे (जिल्हा परिषद अध्यक्षा, रत्नागिरी), सौ. रेवती पाटील (जिल्हा परिषद सदस्य), डॉ.फरहाना अलवी, श्री.स्वप्निल महाडीक (प्रोजेक्ट कॉर्डिनेटर एक्सेल कंपनी), सौ.मानसी पाटील, श्री.अनंत केंद्रे, श्री.संतोष झांजे, सौ.स्वरदा जाधव आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. 
   प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आले. त्यानंतर प्रशालेचे प्राचार्य डॉ.एस.एस.अली यांनी वार्षिक शैक्षणिक उपक्रमांचा व प्रगतीचा आढावा तसेच यापुढे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडला.
       या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी दीप नृत्य, महाराष्ट्र गीत, हिंदी, मराठी चित्रपट गीतांवर रेकॉर्ड डान्स, नाटिका, कोळी नृत्य, मुकअभिनय, योगा व मल्लखांब असे विविध कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमासाठी सर्व पालक वर्ग, प्रतिष्ठित नागरिक यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाच्या नियोजनाची वेगळी झलक अनुभवली आणि संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले.
      यावेळी संस्थाध्यक्ष श्री. सुयश पाष्टे, संस्था उपाध्यक्षा सौ.सुप्रिया पाष्टे, सेक्रेटरी डॉ.संजना पाष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन श्री. उदय शेटवे, खजिनदार श्री.दिग्विजय इंदुलकर,प्राचार्य डॉ. एस. एस.अली, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहर कौचाली व अक्सा रुमाने यांनी केले.
--

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...