कुडोशी येथे एसटी बस-बोलेरो पिकअप समोरासमोर धडकले; दीड तास वाहतूक ठप्प



खेड: तालुक्यातील कुडोशी गावाजवळ जगबुडी नदीवरील पुलावर बुधवारी (२९ एप्रिल) रोजी दुपारी एसटी बस आणि बोलेरो टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. ही घटना बुधवारी दि.२९ रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास अनिकेत फार्म हाऊसजवळ जगबुडी नदीवरील पुलावर घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो टेम्पो हा खोपी येथे सिमेंट व कडप्पे घेऊन जात असताना पुलावरून आंबवली कडून खेडच्या दिशेने येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसशी (एम एच २० बी एल १५७३) त्याची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातानंतर काही काळ पुलावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.
   घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक  व एसटीचे अधिकारी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला काढत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, या अपघातामुळे सुमारे दीड ते दोन तास सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली होती. कुडोशी आणि आंबवली या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेषतः एसटी बसमधील आंबवली, वडगाव, बिरमणी, अस्तान तसेच अठरागाव परिसरातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.
--

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...