खेड: लाईफलाईन मेडिकलचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन केल्यावर ऋतुपर्ण राठोड यांना शुभेच्छा देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम, सोबत नगराध्यक्ष माधवी बुटाला, उद्योजक बशीर हजवाणी आणि मान्यवर.
खेड : शहरातील मुकादम रॉयल आर्केड येथे राठोड कुटुंबियांकडून नव्याने सुरू केलेल्या लाईफ लाईन मेडिकलचा शुभारंभ शनिवारी २४ एप्रिल रोजी राज्याचे गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खेडच्या नगराध्यक्ष माधवी राजेश बुटाला, उपनगराध्यक्ष सतिश चिकणे, दुबईचे उद्योजक बशीर हजवाणी, सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. उपेंद्र तलाठी, चेअरमन राजेश बुटाला, शहरप्रमुख कुंदन सातपुते, गटनेते निकेतन पाटणे, मुरली मनोहर पतसंस्थेचे चेअरमन संजय मोदी, मुकादम मुकादम बिल्डरचे अहमद मुकादम, परवेज मुकादम संजय बुटाला यांच्यासह सर्व नगरसेवक व पदाधिकारी व शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
--
إرسال تعليق