राज्यातील सर्वात मोठ्या गुंतवणुकांपैकी एक उपक्रम कोकणात; डेटा सेंटर प्रकल्पात १.४३ लाख कोटींची गुंतवणूक

मुंबई: राज्यात प्रस्तावित असलेल्या मोठ्या गुंतवणुकांपैकी एक उपक्रम कोकणात होतआहे. कोकणात मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर उभारण्याची योजना तयार होत असून, यासाठी तब्बल १.४३ लाख कोटींची गुंतवणूक प्रस्तावित करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे कोकणाचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 
  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे अनेक कंपन्यांनी डेटा सेंटर उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. हे डेटा सेंटर म्हणजे मोठ्या प्रमाणावर डिजिटल माहिती साठवण आणि प्रक्रिया करणारी अत्याधुनिक केंद्रे असतात. आजच्या डिजिटल युगात क्लाउड सेवा, ऑनलाइन व्यवहार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसाठी अशा केंद्रांची गरज मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
कोकण प्रदेश डेटा सेंटरसाठी योग्य मानला जातो. कारण या भागात समुद्रकिनारा असल्यामुळे आंतरराष्ट्रीय सबमरीन केबल्स जोडणे सोपे होते. तसेच बंदरे, वाहतूक सुविधा आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध जमीन यामुळे कंपन्यांना येथे गुंतवणूक करणे सोयीचे ठरत आहे. याशिवाय मुंबईजवळील स्थान असल्यामुळे तांत्रिक आणि आर्थिक दृष्ट्या देखील हा भाग फायदेशीर मानला जातो.

या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. डेटा सेंटर उभारणी, देखभाल, आयटी सेवा, सुरक्षा आणि लॉजिस्टिक्स अशा विविध क्षेत्रांत हजारो नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता आहे. विशेषतः स्थानिक युवकांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे.

सध्या महाराष्ट्र देशातील डेटा सेंटर क्षेत्रात आघाडीवर आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरांमध्ये आधीच अनेक डेटा सेंटर कार्यरत आहेत. आता कोकणात होणाऱ्या नव्या गुंतवणुकीमुळे राज्याची ही आघाडी आणखी मजबूत होणार आहे. कोकणातील हा डेटा सेंटर प्रकल्प केवळ औद्योगिक गुंतवणूक नसून या प्रकल्पामुळे देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला गती देणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. 
--

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...