खेडमध्ये भाजपची भव्य तिरंगा रॅली; ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने शहर दुमदुमले


खेड : ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने खेड शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी साडेनऊ वाजता रॅलीला सुरुवात झाली. बाजारपेठ मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या जयघोषाने संपूर्ण खेड शहर दुमदुमून सोडले.

रॅलीमध्ये भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, युवक-युवती तसेच देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीचा उत्साह आणि तिरंग्याबद्दलचा अभिमान दिसून आला.

यावेळी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, जिल्हा नियोजन समिती सदस्य केदार साठे, पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, सरचिटणीस अक्षय फाटक, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका स्वप्नाली चव्हाण, खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

“तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला. खेडमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा शहरातील राष्ट्रभक्तीची ताकद दाखवणारा आहे,” असे ॲड. वैभव खेडेकर यांनी सांगितले.
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...