१५ ऑगस्ट मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण


रत्नागिरी, दि. १३ (जिमाका) : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी रत्नागिरी येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय स्वरूपा रविंद्र सामंत यांच्या हस्ते सकाळी ९.०५ वाजता पोलीस परेड ग्राउंड, रत्नागिरी येथे ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

या मुख्य शासकीय सोहळ्यास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या सोहळ्यात राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात येणार असून, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले जाणार आहे.

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी या सोहळ्याची माहिती दिली असून, नागरिकांनी वेळेत उपस्थित राहून स्वातंत्र्य दिनाचा उत्सव उत्साहात साजरा करावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...