आंबये येथे जेसीआय व प्राथमिक आरोग्य केंद्रतर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिर


९३ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी; विद्यार्थ्यांना प्रोटीन डबे व खाऊचे वाटप

खेड: जेसीआय खेड आणि प्राथमिक आरोग्य केंद्र जामगे यांच्या संयुक्त विद्यमाने आंबये-पाटीलवाडी येथील प्राथमिक शाळेत ५ ऑगस्ट रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ९३ लाभार्थ्यांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली.

शिबिरामध्ये नेत्र तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, कर्करोग तपासणी, एचआयव्ही चाचणी, मधुमेह व रक्तदाब तपासणी, आयुष्मान भारत कार्ड सेवा, आभा कार्ड नोंदणी, एएनसी/पीएनसी माता आरोग्य मार्गदर्शन तसेच लाभार्थ्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच ठिकाणी विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याने शिबिराचे विशेष स्वागत करण्यात आले.
महावीर एजन्सीचे अक्षत जैन व शंकर पार्टे यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना प्रोटीनचे डबे वाटप करण्यात आले. तसेच जेसीआय खेडच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांनी आयोजकांचे मनापासून कौतुक केले.

शिबिरासाठी डॉ. नम्रता भुवड, डॉ. आदित्य चिंदे आणि डॉ. ज्ञानेश्वर मारकड यांनी वैद्यकीय सेवा दिली. यावेळी जेसीआयचे माजी संचालक जेसी शंकर पार्टे, सीएचओ शुभांगी ओसवानी, आरोग्य सेवक सतीश येवले, आरोग्य सेविका शुभांगी हरावडे, आशा सेविका अस्मिता सकपाळ, मनीषा निवाते, मदतनीस शिल्पा दळवी, अंगणवाडी सेविका मोरे, मुख्याध्यापिका सौ.सावंत, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर जेसी शंकर पार्टे यांनी नियोजन व समन्वयाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. कार्यक्रमासाठी JFM अमित नमुष्टे (अध्यक्ष, जेसीआय खेड), JFM मधुर पेठे (सचिव, जेसीआय खेड) आणि जय पद्मिनी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा, आरोग्याविषयी जनजागृती आणि विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी मनापासून स्वागत करत आयोजकांचे अभिनंदन केले.
--

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...