मानवी दैनंदिन जीवनात लहानसहान तक्रारी जसे की आम्लपित्त, खोकला, पोटातील उष्णता, डोकेदुखी किंवा झोप न लागणे यांचा सामना अनेकदा करावा लागतो. अशावेळी लगेच औषधांवर अवलंबून न राहता काही सोपे घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतात. आपल्या पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञानात अशा अनेक नैसर्गिक उपायांचा समावेश आहे.
१)आम्लपित्ताच्या त्रासावर आवळा अत्यंत गुणकारी मानला जातो. आवळ्याच्या रसात जिरे आणि खडीसाखर घालून दिवसातून दोन वेळा घेतल्यास काही दिवसांत आराम मिळतो. तसेच आवळा भाजून खाल्ल्यास खोकल्यावरही लवकर परिणाम दिसून येतो.
२)पोटातील उष्णता वाढल्यास धने पाण्यात भिजवून त्याचे पाणी दिवसातून काही वेळा घेतल्यास शरीराला थंडावा मिळतो.
३)अंगावर पित्त उठणे किंवा अॅलर्जीची समस्या असल्यास कुटलेला ओवा, गूळ आणि आल्याचा रस यांचे मिश्रण फायदेशीर ठरते.
४)खोकल्यासाठी ज्येष्ठमध आणि सितोपलादी चूर्ण तूप-मधातून घेतल्यास छाती हलकी होण्यास मदत होते. तसेच आवाज बसल्यास हळद आणि गूळ याच्या गोळ्या गरम दुधासोबत घेतल्यास फायदा होतो.
५)उन्हाळ्यात जास्त घाम येणे किंवा शरीर थंड पडणे यासाठी सुके खोबरे, लसूण आणि ओवा यांचे गोळे उपयुक्त ठरतात. तुळशीचा रस आणि मध नियमित घेतल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
६) झोप न लागण्याच्या समस्येवर झोपण्यापूर्वी पायांना मोहरीच्या तेलाची मालिश केल्यास चांगली झोप लागते.
७)तोंडातील दुर्गंधी आणि हिरड्यांच्या समस्यांसाठी गुलाब पाणी आणि लिंबाचा रस याने गुळण्या करणे फायदेशीर आहे. पोटदुखीवर साजूक तूप आणि हिंग उपयोगी ठरते. तसेच लिंबू, मीठ आणि साखर यांचा वापर पचन सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो.
८)गाजर हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त भाजी आहे. त्यात व्हिटॅमिन ‘ए’, कॅल्शियम आणि कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते, जे डोळे, हृदय आणि पचनसंस्थेसाठी लाभदायक आहे. मात्र, त्याचे प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे.
हे सर्व उपाय साधे असले तरी ते नियमित आणि योग्य पद्धतीने केल्यास लहान आजारांवर प्रभावी ठरतात. मात्र, गंभीर किंवा दीर्घकालीन त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
--
Post a Comment