जमिनींचे प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी राज्य सरकारची ‘महसूल लोक अदालत’ मोहीम

मुंबई : महाराष्ट्रातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले महसुली दावे आणि जमिनीचे वाद जलदगतीने निकाली काढण्यासाठी राज्य सरकारने ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

🔹 १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ मोहीम

महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या सात महिन्यांच्या कालावधीत राज्यभर हे अभियान राबवले जाणार आहे.

🔹 तीन महिन्यांनी महसूल लोक अदालत

अभियानादरम्यान दर तीन महिन्यांनी महसूल लोक अदालत आयोजित करून प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यावर भर दिला जाणार आहे.

🔹 तीन महिन्यांनी महसूल लोक अदालत

मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी स्तरावरील न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या विविध महसुली प्रकरणांवर सुनावणी घेण्यात येणार आहे. 

यामध्ये—
- जमिनीच्या नोंदींबाबतचे वाद
- जमिनीच्या सीमांचे वाद
- मालकी व हक्कांचे दावे
- इतर प्रलंबित महसुली प्रकरणे
. यांचा समावेश आहे.

🔹 नागरिकांना काय फायदा?

जमिनीच्या वादांमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांना अनेक वर्षे सरकारी कार्यालये व न्यायालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. या विशेष अभियानामुळे वेळ, पैसा आणि प्रशासकीय त्रास कमी होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचा विशेष आराखडा तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार असून, राज्यातील लाखो नागरिकांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...