खेड: तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या
विद्यार्थ्यांनी पाठविलेल्या राख्या सैनिकांनी आनंदाने स्वीकारल्या.
खेड: श्री समर्थ विश्व कृपा प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रेमाने व मनापासून तयार केलेल्या राख्या देशाच्या सीमेवर कार्यरत असलेल्या शूर सैनिकांपर्यंत पोहोचल्या. रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सैनिकांप्रती व्यक्त केलेल्या प्रेम, आदर आणि कृतज्ञतेला या उपक्रमातून भावपूर्ण अभिवादन मिळाले.
देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या पाठविण्यात आल्या. या राख्यांमधून सैनिकांविषयी असलेला आदर, आपुलकी, प्रेम आणि शुभेच्छा व्यक्त झाल्या. देशसेवेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या जवानांपर्यंत विद्यार्थ्यांच्या भावना पोहोचल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
विद्यार्थ्यांनी पाठविलेल्या राख्या सैनिकांनी आनंदाने स्वीकारल्या. तसेच सैनिकांनी सुंदर फोटो व व्हिडिओद्वारे आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. सैनिकांचे हे मनोगत पाहताना विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण शाळा परिवार भावूक झाला.
विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि सैनिकांविषयी आदराची भावना रुजविणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
--
إرسال تعليق