आठ महिन्यांपूर्वी हरवलेले पाकीट रिक्षाचालकाने केले परत; खेडमध्ये सिकंदर कुंभार्लीकर यांचा सत्कार

खेड: आठ महिन्यांपूर्वी अहमद चौगुले यांचे हरवलेले पाकीट रिक्षाचालक सिकंदर कुंभार्लीकर यांना सापडले. या पाकिटात तब्बल चार हजार दोनशे रुपये तसेच महत्त्वाची कागदपत्रे होती. प्रामाणिकपणे हे पाकीट संबंधित व्यक्तीकडे परत केल्याबद्दल सिकंदर कुंभार्लीकर यांचा खेडमध्ये सत्कार करण्यात आला.

अहमद चौगुले यांच्या वतीने सिकंदर कुंभार्लीकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप नेते तथा खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव खेडेकर, युसूफ चौगुले, वहीद चौगुले, भाजप अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तसेच खेड नगरपरिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सबीहोल, भाजप युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अॅड. मिलिंद ऊर्फ दादू नांदगावकर, साजिद रावल आणि भाजप सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार आदी उपस्थित होते.

प्रामाणिकपणाचा आदर्श

समाजामध्ये प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न सिकंदर कुंभार्लीकर यांनी केला आहे. हरवलेले पाकीट आणि त्यातील रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे स्वतःकडे न ठेवता त्यांनी ती प्रामाणिकपणे परत केली.

त्यांच्या या कृतीचे कौतुक करताना, प्रत्येक रिक्षाचालकाने आणि नागरिकाने अशाच प्रकारे प्रामाणिकपणा जपावा, असे आवाहन भाजप नेते तथा खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव खेडेकर यांनी केले. सिकंदर कुंभार्लीकर यांच्या प्रामाणिकपणाचे उपस्थितांनी कौतुक केले.
--

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...