किंग स्टार कंपनीकडून शिक्षण, रोजगार आणि सुरक्षित भविष्यावर भर

मुंबई : शिक्षण, रोजगार, आर्थिक सक्षमता आणि सुरक्षित भविष्याच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किंग स्टार कोचिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती कंपनीने प्रसिद्ध केलेल्या माहितीतून समोर आली आहे. कंपनीचे सीएमडी प्रशांत कृष्ण थेराडे यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या कार्यपद्धतीविषयी आणि भविष्यातील नियोजनाबाबत माहिती देण्यात आली आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, किंग स्टारमध्ये अनुभवी नेतृत्व, ट्रेडिशनल मार्केटिंगचा अनुभव, कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता, GST व TDS संबंधित अनुपालन, सॉफ्टवेअर प्रणाली, बँक खाते, वेळेवर पेमेंट आणि नियोजनबद्ध कामकाज यावर भर दिला जातो.

कंपनीने आपल्या कार्यपद्धतीची २१ प्रमुख कारणे नमूद केली असून, त्यामध्ये सिस्टम सपोर्ट, प्रशिक्षण सुविधा, कोअर कमिटी लीडर्स, स्वतंत्र ट्रेनर, ५ वर्षांचा रोडमॅप, स्पष्ट उद्दिष्टे, बॅकअप सपोर्ट, मजबूत टीम व नेटवर्क, २४x७ तांत्रिक सहाय्य तसेच सुरक्षित आणि पारदर्शक व्यवहार यांचा समावेश आहे.

शिक्षण आणि रोजगाराला प्राधान्य

कंपनीच्या माहितीपत्रकानुसार, विद्यार्थ्यांना व युवकांना नवीन कौशल्ये शिकण्यासाठी ऑनलाइन शिक्षण व प्रशिक्षणाच्या संधी, तसेच स्वयंरोजगार व कामाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. सदस्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने Accident Benefit Fund ची संकल्पना असल्याचेही कंपनीने नमूद केले आहे.

मेहनत करणाऱ्या सदस्यांचा आणि लीडर्सचा उत्साह वाढविण्यासाठी विविध गिफ्ट, पुरस्कार आणि सन्मान देण्याची परंपरा असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

पाच वर्षांचा रोडमॅप

किंग स्टारने आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी पाच वर्षांचा रोडमॅपही मांडला आहे. पहिल्या वर्षात मजबूत पाया आणि टीम बांधणी, दुसऱ्या वर्षात नेटवर्क विस्तार, तिसऱ्या वर्षात उत्पादन व सेवा विस्तार, चौथ्या वर्षात राष्ट्रीय स्तरावर नेटवर्क मजबूत करणे आणि पाचव्या वर्षात नेतृत्व, स्थिरता व दीर्घकालीन यशाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे कंपनीच्या माहितीमध्ये नमूद आहे.

“शिका, काम करा, प्रगती करा आणि इतरांनाही प्रगतीची संधी द्या” हा संदेश देत शिक्षण, रोजगार आणि सुरक्षित भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्याचा कंपनीचा मानस असल्याचे या माहितीपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे.
--
Advt.
https://www.nirzardigital.online/2026/08/blog-post_530.html

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...