दापोली :तालुक्यातील शिवनेरी शिक्षण संस्था संचलित कै. कमलाकर जनार्दन तथा भाई जावकर विद्यामंदिर तेरेवायंगणी येथे शिवसेना दापोली तालुका संपर्कप्रमुख प्रवीण लाड यांच्या सौजन्याने आणि जिल्हापरिषद सदस्य किशोर देसाई यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .
शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाच औचित्य साधुन प्रशालेची माजी विद्यार्थिनी सानिया शिवराम बालगुडे Msc (Analytical Chemistry) च्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे तिला IAPA संस्थेचे ट्रस्टी श्री व सौ मांडवकर दाम्पत्याकडून लॅपटॉप भेट देण्यात आला.
शाळेला सर्वतोपारी प्रशासकीय स्तरावर तसेच भौतिक सुविधा मिळवून देण्यासाठी कायम सोबत राहण्याचे अभिवचन याप्रसंगी किशोर देसाई व प्रवीण लाड यांनी आपल मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला शिवनेरी शिक्षण संस्था अध्यक्ष श्री.निवास जाधव, सचिव भिकाजी करबेले, खजिनदार के. बी. भातडे, ग्रामविकास मंडळ मुंबई अध्यक्ष प्रकाश शिगवण, डी. एल. कोलंबे,अनिल जाधव, तानाजी शिगवण, चंद्रकला शिगवण, शर्मिला शिगवण, माजी सरपंच मनोहर करबेले,चिखलगाव चे उपसरपंच जयवंत जाधव, हरिश्चंद्र भातडे, नारायण कावणकर, हायस्कुलचे मुख्याध्यापक शिगवण, सदावर्ते सर, सौ.तांबे आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक वर्ग आणि कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
--
Post a Comment