जे. ई. ई. मेन्समध्ये वेरळच्या समर्थ कृपाचे उल्लेखनीय यश

खेड: व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या जे. ई. ई. मेन्स परीक्षेमध्ये श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज(सी.बी.एस.ई.), वेरळ येथील १२ वीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात उत्तुंग भरारी घेतली आहे.
    
यामध्ये पारस झगडे (९९.०१ %टाईल), सोहम म्हसकर (९४.७२ %टाईल), सिध्दांत तिरपुडे (९३.७० %टाईल ), अर्णव गोगेकर (९३.४९ %टाईल ), अरस्लान खान (८८.३६ %टाईल), ऋतुराज जाधव (८४.०० %टाईल), ओवेस नागुठणे (८६.१८%टाईल ),  शताक्षी मयेकर(८२.९३ %टाईल), प्रज्वल सुरवसे (८१.०७ %टाईल ), त्रिथा कांबळे (७५.४७ %टाईल), आदित्य मूर्ती (७५.३५%टाईल) या विदयार्थांनी यश संपादन करुन प्रशालेच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव कोरले असून प्रशालेची अविरत यशाची परंपरा चालू ठेवली आहे.
    या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना जेईई व निट विभागप्रमुख विनोद सिंग, मयंक गुप्ता , अश्विनी कुमार, आदर्श गौरव, अंकित, शिवा, नागेंद्र सिंग, राजेश या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
    संस्था अध्यक्ष श्री. सुयश पाष्टे, चेअरमन श्री. उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉ. एस. एस. अली, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
--

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...