सर्वसामान्यांना किफायतशीर दरात आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार - ना. योगेश कदम

खेड:सर्वसामान्यांना वेळेवर व किफायतशीर दरात आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार असल्याचे मत राज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी व्यक्त केले.

शहरातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचा' उद्घाटन
सोहळा गुरुवारी (दि. ९) उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे लोकार्पण राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. खेड नगरपरिषद आणि घरडा हॉस्पिटलच्या सहकार्याने सुरू झालेला हा दवाखाना परिसरातील आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरपरिषदेचे  मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी केले. या उपक्रमासाठी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांनी मंत्री ना. योगेश कदम यांचे आभार मानले. कार्यक्रमास प्रांताधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार सुधीर सोनवणे, नगराध्यक्षा माधवी बुटाला, घरडा फाऊंडेशनचे विश्वस्त सतीश वेंगोली, डॉ. फिरोज पटेल, आरोग्य सभापती तोसिफ खोत, गटनेते निकेतन पाटणे आदी उपस्थित होते.
घरडा हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या दवाखान्यात विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या सुविधेमुळे गरजू रुग्णांना उपचारासाठी दूरवर जाण्याची गरज भासणार नाही, असा विश्वास नगरपरिषदेकडून व्यक्त करण्यात आला. या उद्घाटन सोहळ्यास शहरातील नागरिक, नगरसेवक तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी संख्येने उपस्थित होते.
--

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...