समर्थ कृपा विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

खेड: श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनिअर कॉलेज (सी .बी .एस .ई ) वेरळ मध्ये शनिवार ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.            
   यावेळी प्रशालेचे प्राचार्य डॉ.एस.एस. अली यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच प्राचार्य डॉ.एस.एस. अली यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याविषयी माहिती दिली.
     यावेळी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
--
खेड: वेरळ येथील श्री समर्थ कृपा प्रशालेत महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.   
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...