खवटीचे पोलीस पाटील मनोहर दळवी यांना उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार

खेड  :तालुक्यातील खवटी गावचे कर्तव्यदक्ष, लोकाभिमुख व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले पोलीस पाटील मनोहर पांडुरंगराव दळवी यांना महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे 'उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.
हा पुरस्कार १ ऑगस्ट २०२६ रोजी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सन २०२५-२६ या महसुली वर्षात महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. खवटी गावात शांतता, सुव्यवस्था राखणे, सामाजिक सलोखा जपणे तसेच शासनाची प्रतिमा उंचावणारे कार्य केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

मनोहर दळवी हे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही सक्रिय असून, खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यामुळे परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळाली आहे.

या पुरस्कारामुळे समाजहितासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तींना नवी प्रेरणा मिळेल, अशी भावना ग्रामस्थ व मित्रपरिवाराने व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची घेतलेली दखल ही संपूर्ण खेड तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याचेही ग्रामस्थानी  सांगितले.
--

 

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...