खेड-भरणे मार्गावर दुचाकीचा अपघात; दोघे जखमी

खेड : खेड-भरणे मार्गावर पाटीदार भवनजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोन जण झाले. हा अपघात आज, शनिवार दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.४६ वाजण्याच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, खेडहून धवडे येथे जात असलेली एम एच ०८ एडी ००७९ क्रमांकाची दुचाकी भरणे-खेड मार्गावर पाटीदार भवनजवळ घसरून अपघातग्रस्त झाली.

घटनेची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली २४ तास अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सेवेत असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान, नाणीजधाम यांची विनामूल्य रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघातात प्रिया प्रेम मोरे (वय २५, रा. धवडे) आणि प्रेम मोरे (वय २८) हे दोघे जखमी झाले आहेत.

रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...