ज्येष्ठ संचालक अरविंद तलाठी यांच्या हस्ते ध्वजारोहण; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
खेड:येथील श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. संस्थेचे ज्येष्ठ संचालक अरविंद तलाठी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी शाळेचे चेअरमन राजेश बुटाला, माजी चेअरमन ना. बा. शेलार, प्रायमरी विभागाचे चेअरमन संजय मोदी, पंकज शहा तसेच संचालक संजय बुटाला, आनंद कोळेकर, मिलिंद तलाठी, वेद तलाठी यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान शालेय स्तरावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
श्री मुरली मनोहर नागरी पतसंस्थेचे चेअरमन व नगरसेवक संजय मोदी यांची सहजीवन शिक्षण संस्थेच्या विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल शाळेचे चेअरमन राजेश बुटाला यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच संचालक संजय बुटाला यांच्या वाढदिवसानिमित्त संजय मोदी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील ज्येष्ठ शिक्षक गोविंद राठोड यांची सहजीवन कर्मचारी सहकारी पतपेढीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल प्रायमरी विभागाचे चेअरमन व नगरसेवक संजय मोदी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
--
Post a Comment