मर्चंट नेव्हीतील करिअरच्या संधींची विद्यार्थिनींना माहिती; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

खेड : शहरातील बज्म-ए-इमदादीया संस्थेच्या एम.आय.ए. केजी अँड प्रायमरी स्कूल तसेच एम.आय.बी. गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शुक्रवारी (दि. १७ जुलै २०२६) करिअर मार्गदर्शन कार्यक्रमासह ‘एक पेड माँ के नाम’ या वृक्षारोपण उपक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे मार्गदर्शन नॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स इंडियाचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी केले, तर अध्यक्षस्थानी ए.आर.डी. खतीब होते. प्रमुख पाहुणे म्हणून सलीम झगडे, विशाल गुजर, इरफान चिपळूणकर, अभिलाषा सोनवणे, श्याम हरवंदकर तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते.

संस्थेच्या ध्वजारोहणानंतर कुरआन पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी मिलिंद कांदळगावकर यांनी मर्चंट नेव्ही क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, प्रशिक्षण प्रक्रिया, रोजगाराच्या संधी तसेच या क्षेत्रातील आकर्षक वेतन आणि प्रगतीच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी मर्चंट नेव्हीचा करिअरचा पर्याय गांभीर्याने विचारात घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विद्यार्थिनी व पालकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

त्यानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ‘एक पेड माँ के नाम’ हा वृक्षारोपण उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थिनींनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मोहिते यांनी केले, तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
--

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...