खेड : भारतीय जीवन विमा निगम (LIC)च्या टीम खेड सॅटेलाईट ऑफिसच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत "रक्तदान करा... जीवनदान द्या..." या संदेशातून अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हे रक्तदान शिबिर सकाळी १०.३० ते दुपारी २.०० या वेळेत शहरातील महाड नाका येथील एलआयसी सॅटेलाईट ऑफिसमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आपल्या छोट्याशा योगदानामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, या भावनेतून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून समाजकार्यात हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी श्री. राजन राणे (मो. ९४२३०६२२८२) तसेच श्री. उमेश नक्षे (मो. ९१५८५१३९७३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
--
إرسال تعليق