चिपळूणकरांसाठी गूड न्यूज; १ जुलैपासून पोस्टाचा स्वतंत्र 'चिपळूण विभाग' कार्यरत


चिपळूण : उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील पोस्टल ग्राहकांसाठी आणि प्रशासकीय यंत्रणेसाठी दिलासादायक निर्णय घेत डाक निदेशालय, नवी दिल्ली यांच्या मंजुरीनुसार पोस्टाचा स्वतंत्र 'चिपळूण विभाग' बुधवार, १ जुलै २०२६ पासून कार्यरत होत आहे. नव्या विभागाचा शुभारंभ १ जुलै रोजी सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी चिपळूण, खेड, दापोली, गुहागर आणि मंडणगड या उत्तर रत्नागिरीतील पाच तालुक्यांतील सर्व डाकघरे आता नव्या चिपळूण विभागाच्या अखत्यारीत येणार आहेत. त्यामुळे या भागातील पोस्टल सेवांचे प्रशासन अधिक कार्यक्षम व गतिमान होणार आहे.

सध्याचा रत्नागिरी डाक विभाग राजापूरपासून वेशवीपर्यंत विस्तीर्ण आणि दुर्गम भागात पसरलेला असल्याने विभागीय कामकाजात अनेक अडचणी निर्माण होत होत्या. विविध प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना रत्नागिरी येथील विभागीय कार्यालयात जावे लागत असल्याने वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत होता.

नवीन चिपळूण विभाग अस्तित्वात आल्यामुळे उत्तर रत्नागिरीतील नागरिकांना विभागीय स्तरावरील बहुतांश कामांसाठी आता चिपळूणमध्येच सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पोस्टल सेवा अधिक जलद, सुलभ आणि परिणामकारक होण्यास मदत होणार असून ग्राहकांची गैरसोयही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...