खेड:भरणे-खेड मार्गावर भरधाव डंपरने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी सायंकाळी ४ वा सुमारास घडला. नवीन कदम (रा. नांदिवली, ता. खेड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भिलारे
आयनी येथील संतोष भिलारे हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा
(एमएच ०८ एक्यू ८७८४) घेऊन भरणे येथून खेडच्या दिशेने जात होते. त्यांच्या रिक्षाने आठवडा बाजार परिसर गाठला असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती
की रिक्षाचा मागील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात रिक्षाचालक संतोष भिलारे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात
दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मृत्यूमुखी पडलेले नवीन कदम हे रिक्षामध्ये प्रवास
करत होते की रिक्षात बसण्यासाठी हात दाखवत असताना अपघातात सापडले, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
--
إرسال تعليق