खेड : स्वतंत्र व निष्पक्ष पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी ३ मे रोजी साजरा केला जाणारा जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन यंदाही उत्साहात साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर दि. ४ मे २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास सुनील विंचू , भाजप शहर प्रमुख भालचंद्र साळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी पत्रकार हर्षल शिरोडकर, दिवाकर प्रभू, किशोर साळवी, अश्विनी वडके आणि अनुज जोशी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सांगली जिल्ह्यातील तासगाव सेवा केंद्रातील ब्रह्माकुमारी वैशाली उपस्थित होत्या.
यावेळी ब्रह्माकुमारी वैशाली यांनी पत्रकारितेचे स्वर्णिम जगाच्या निर्मितीतील महत्त्व अधोरेखित करत माध्यमांनी सत्य, पवित्रता व शांतीच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी जबाबदारीने कार्य करावे, असे आवाहन केले. स्वतःचा खरा परिचय करून घेत समाजहितासाठी कार्यरत राहण्याचेही त्यांनी मार्गदर्शन केले.
तसेच सुनील विंचू यांनी राजस्थानमधील माऊंट अबू येथील ब्रह्माकुमारी मुख्यालयात आयोजित सेमिनारमधील आपले अनुभव कथन केले.
सन्मानित पत्रकारांनी मनोगत व्यक्त करताना या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय चे आभार मानले. कार्यक्रमास उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ब्रह्माकुमारी गीता तसेच विद्यालयातील सर्व ब्रह्मवृंदानी केले होते.
--
إرسال تعليق