खेड: येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मुकादम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक शमशुद्दीन मुकादम यांची पुतणी व परवेज मुकादम यांची कन्या डॉ. दानिया परवेज मुकादम हिने एमबीबीएस अंतिम परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
डॉ. दानिया मुकादम यांच्या या यशामुळे मुकादम कुटुंबासह खेड मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दानिया यांचे आजोबा अहमद भाई मुकादम हे येथील एल टी टी इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष आहेत. तसेच त्यांचे काका शमशुद्दीन मुकादम हे हाजी एस. एम. मुकादम हायस्कूलचे अध्यक्ष आहेत. वडील परवेज हे एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. बालपणी चे शिक्षण त्यांनी एल टी टी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पूर्ण केल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांनी मुंबईतील नेरूळ येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात प्रवेश घेतला व तेथे एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केले. पुढे एमडी मेडिसिन ही पदवी घेण्याचा त्यांचा मानस आहे. गोरगरिबांच्या वर उपचार करणे त्यांना सातत्याने मदत करणे हे तिला आवडते. व आयुष्यभर अशा रुग्णांची सेवा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या कुटुंबात लहानपणापासूनच शैक्षणिक वातावरण असल्यामुळे दानिया यांना चांगले वातावरण मिळाल्यामुळे शिक्षणात त्या प्रगती करत गेल्या. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक करण्यात येत आहे. तिच्या उज्ज्वल यशाबद्दल पालकांचे तसेच डॉ. दानिया मुकादम यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
--
Post a Comment