खेड :तालुक्यातील आंबवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे.
तालुक्यातील आंबवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कुमारी चिन्मयी श्रीकृष्ण खांडेकर हिने राष्ट्रीय गुणवत्ता यादीत ६ वे स्थान मिळवले असून कुमारी पूर्वा सतीश यादव ही जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये ३२ वी व कुमार रुद्र शरद कदम जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये १४१ वा आल्यामुळे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या रसिका रमेश रेवाळे (खांडेकर )तसेच मुख्याध्यापक श्रीकृष्ण सहदेव खांडेकर, वरवली केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सपकाळ ,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साक्षी सतीश यादव, उपाध्यक्ष सिद्धी विनायक यादव, आंबवली गावचे सरपंच राजेश्री राजेश यादव, उपसरपंच विजय केशव यादव, पोलीस पाटील संदीप बळीराम यादव, तंटामुक्त अध्यक्ष लक्ष्मण गोगावले, उपाध्यक्ष, श्री. शिर्के सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
--
إرسال تعليق