'भुलेश्वर’चा निसर्ग घालतोय साद; पर्यटनाला मिळतेय नवी ओळख

खेड : हिरव्यागार नटलेल्या वनराई, सोसाट्याचा वारा, डोंगरांच्या काळ्या-पांढऱ्या रांगा आणि नानाविध निसर्गरम्य रूपांनी सजलेल्या खेड तालुक्यातील फुरूस येथील ‘भुलेश्वर’ शिवमंदिर परिसर सध्या पर्यटकांना आकर्षित करीत आहे. पावसाळ्यात या परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत असल्याने निसर्गप्रेमी आणि भाविकांची येथे गर्दी वाढत आहे.
फुरूस गावात श्रीशंकराचे प्राचीन भुलेश्वर मंदिर असून, श्रावण महिन्यात येथे दरवर्षी विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात. मंदिर परिसरातून दिसणारा हिरवाईने नटलेला निसर्ग, डोंगररांगा आणि शांत वातावरण पर्यटकांना विशेष भावते. नागमोडी रस्ता आणि टेकडीवर पोहोचल्यानंतर मिळणारा निसर्गाचा मनोहारी अनुभव हे या परिसराचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.
मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरून पुढे गेल्यानंतर निसर्गाचे वेगळेच रूप अनुभवता येते. पावसामुळे परिसरातील डोंगर, झाडे आणि मोकळी हिरवीगार मैदाने अधिकच खुलून दिसतात. त्यामुळे छायाचित्रण आणि निसर्गभ्रमंतीसाठीही हा परिसर आकर्षणाचे केंद्र बनला आहे.

समुद्रसपाटीपासून उंचावर असलेल्या भुलेश्वर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर निसर्गाचा अद्भुत आविष्कार मानला जातो. सध्या मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जाही मिळाला असून, येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी दापोली मार्गावरूनही रस्ता उपलब्ध असल्याने भाविक व पर्यटकांना येथे पोहोचणे सोयीचे झाले आहे.

प्राचीन मंदिर, धार्मिक महत्त्व आणि पावसाळ्यात खुलणारे निसर्गसौंदर्य यामुळे फुरूसमधील भुलेश्वर परिसर खेड तालुक्याच्या पर्यटन नकाशावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करीत आहे.
--

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...