रघुवीर घाट १० ऑगस्टपर्यंत पर्यटकांसाठी बंद; दरडीचा धोका, प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय


खेड: पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला खेड तालुक्यातील रघुवीर घाट सुरक्षेच्या कारणास्तव ९ जुलै ते १० ऑगस्ट २०२६ या कालावधीत पर्यटकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. डोंगर भागात दरड कोसळण्याची शक्यता तसेच संभाव्य जिवीतहानी टाळण्यासाठी खेडच्या उपविभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६१ वरील साखळी क्र. १०३/०० ते १०४/०० दरम्यान दरीकडील रस्त्याची कडा तुटली आहे. तसेच कि.मी. १००/५०० ते १०५/५०० या भागात डांबरी रस्ता आणि साईडपट्टी खचली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती व दगड आले आहेत. त्यामुळे रस्त्याला तडे जाण्याची आणि गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यामुळे घाट परिसरातील सर्व पर्यटनस्थळांवर पर्यटकांना थांबण्यास आणि खासगी वाहनांच्या प्रवेशास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

*परवानगी असलेली वाहने*

अत्यावश्यक सेवेतील चारचाकी वाहने

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसेस


*प्रवेशबंदी*

सर्व प्रकारची जड वाहने

सर्व खासगी वाहने

पर्यटकांना घाटातील पर्यटनस्थळांवर थांबण्यास पूर्ण मनाई


प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, नैसर्गिक आपत्तीचा धोका लक्षात घेता विनाकारण रघुवीर घाट परिसरात जाणे टाळावे, असेही स्पष्ट केले आहे.
--

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...