दापोलीच्या शिवानी भैरमकरना पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट!




दापोली: येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील विस्तार शिक्षण विभागाचे माजी वरिष्ठ संशोधन अधिकारी डॉ. महेंद्र भैरमकर यांची  मुलगी शिवानी भैरमकर हिने पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातून सूक्ष्म जीवशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. जागतिक स्तरावर दोन टक्के ख्यातनाम शास्त्रज्ञांमध्ये समावेश असलेल्या प्रा. डॉ. स्मिता झिंजार्डे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने संशोधन केले. धातूंच्या प्रदूषणावर उपाय शोधणारे तिचे संशोधन आजच्या प्रदूषणाच्या काळात पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. कु. शिवानी हिचे चार शोध निबंध आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. 
    डॉ. शिवानी भैरमकर ह्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल त्यांच्यावर सर्व थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
--

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...